आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वार्षिक उत्पन्न 25 हजार रुपये, केंद्रीय मंत्री दानवेंच्या गावातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नरेंद्र दामोदरदास मोदी, रहिवासी भोकरदन जिल्हा जालना. मजूरीपासूनचे उत्पन्न 25 हजार रुपये. ही थट्टा नाही, तर खरे आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या भोकरदन तहसिल कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे 25 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या नावे काढण्यात आलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सध्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. भोकरदन तहसिल कार्यालयाचा भोंगळ कारभार यातून उघड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधानांच्या नावाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर अशा पद्धतीने बनावट प्रमाणपत्र तयार करणारी टोळीच भोकरदनमध्ये कार्यरत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या प्रमाणपत्रावर भोकरदन तहसील कार्यालयाचा शिक्का आणि तहसीलदारांची स्वाक्षरी आहे. उत्पन्न प्रमाणपत्रावरील माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2014 रोजी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज एक दिवस आधी, अर्थात 29 सप्टेंबरला प्राप्त झाल्याचे त्यावर नोंदवण्यात आले आहे. मात्र हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा नायब तहसीलदार रामभाऊ शेळके यांनी केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे प्रकरण आणि किती आहे मोदींचे खरेखुरे उत्पन्न