आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्योत्सव : शब्दांच्या पावसात रसिक भिजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सूर जाहला ईश्वर,
शब्द जाहले मायबाप
गीत उच्चारू लागले
सात सूर सात जन्म,
एक गाणे पूर्ण ब्रह्म

कवितेतील शब्दसामर्थ्य आणि त्याचा अर्थ अधोरेखित करणाऱ्या कवितांचा रविवारी जणू पाऊसच झाला. तीन दिग्गज सोलापूरकरांच्या भेटीस आले. शब्द शब्दांची गुंफण करत रसिकांना रिचवले. निमित्त होते कविवर्य दत्ता हलसगीकर यांच्या स्मृतीचे. स्मृती समिती आणि सोलापूर आकाशवाणीने त्याचे आयोजन केले होते. सहभाग होता- वैभव जोशी, अरुण म्हात्रे आणि संदीप खरे या दिग्गजांचा.

विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ते नायगावकर यांच्यापर्यंतच्या कविता या काव्योत्सवात बरसल्या. विदर्भीय विठ्ठल वाघ आणि कोकणातले विंदा यांच्या आवाजातील कविता त्यांनी सादर केल्या. त्यामुळे रसिकांची हसून हसून पुरेवाट झाली. विठ्ठल वाघ यांचा आवाज मोठा असल्याने त्यांच्या गाण्यातील शब्द नीट समजत नाहीत. हे साभिनय सादर करताना म्हात्रेंनी नंतर प्रत्येक शब्दाची फोडही केली. अस्सल प्रेमकविता लिहिणारे विंदा गाताना मात्र तुसडेपणा दाखवतात, हेही त्यांनी साभिनय सादर केले.

विनोद, कविता अन् नकला
तिन्हीकवींनी अतिशय मोकळ्या वातावरणात शब्दांची उधळण केली. त्यात विनोद होता आणि नकलाही होत्या. प्रेमकविता लिहिणारे संदीप खरे म्हणाले, 'माझे मित्र नेहमी म्हणतात, तुझे काय बाबा...मजाच असणार. प्रेमकविता लिहितो म्हणजे रोजच वेगळे असणार. त्यावर मी नेहमी उत्तर देतो, चितळे बंधू स्वत: भाकरवडी खात नाहीत...” या वाक्यावर सभागृहात उपस्थित रसिकांमध्ये एकच हशा पिकला.
बातम्या आणखी आहेत...