आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जा-राजाची दिमाखात मिरवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. अशा परिस्थितीतही शेतकर्‍यांनी लाडक्या सर्जा-राजाची ढोलताशाच्या गजरात थाटात मिरवणूक काढली. हसरूल, पडेगाव, भावसिंगपुरा, चिकलठाणा परिसरातील शेतकर्‍यांनी मोठय़ा उत्साहात बैल पोळा सण साजरा केला.

गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाचे सावट आहे. नदी, नाल्यांना पूर येईल असा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, धरणे, विहिरी, तलावात जेमतेम जलसाठा शिल्लक राहिला. शेतकर्‍यांनी यावर मात करत वॉशिंग सेंटर, विहिरीतील पाणी काढून बैलांना अंघोळ घातली. बाजारातून महागाचे झुला, घागरमाळा, कवड्याची माळ, घंटी, वेसण, फुगे, कासरा, म्होरकी, शिंगाला लावण्यासाठी हिंगूळ खरेदी करून बैलांना सजवण्यात आले होते. पाठीवर विविध रंगानी टिपके देण्यात आले होते. यामुळे बैल शोभून दिसत होते. हसरूल येथील उत्तरमुखी रुद्र हनुमान मंदिरासमोर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोळा भरला. 6.15 मिनिटांनी पोळा फुटला.