आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मोटारवाहन कायद्याची पायमल्ली; दोन दिवसांत १२७ ऑटोरिक्षा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद- मोटारवाहन कायद्याची पायमल्ली करून सुसाट धावणाऱ्या १२७ ऑटोरिक्षा जप्त केल्या आहेत. पुढील दोन दिवस मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी सांगितले. 

शहरात २७ हजारांवर ऑटोरिक्षा धावतात. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालक मोटार वाहन नियमांचे पालन करत नाहीत. अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. चालकाकडे परवाना नसतो. यावर निर्बंध घालण्यासाठी आरटीओ विभागाने सोमवारपासून चार पथके नेमून मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी (सोमवारी) ७० आणि मंगळवारी ५७ नियमबाह्य धावणाऱ्या ऑटोरिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, नियमबाह्य धावणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या हजारात आहे. मोहीम सुरू होताच ऑटोरिक्षा चालकांनी त्या रस्त्यावर आणणे बंद केले आहे. कारवाईची वेळ स. ते आणि साय. ते अशी आहे. तसेच स्थळ निश्चित केले आहे. त्याव्यतिरिक्त इतर मार्गांवर ऑटोरिक्षा चालवल्या तरी कोणताच फरक पडत नाही. 
बातम्या आणखी आहेत...