आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या काळ्या फिल्म उतरवल्या, वाहतूक शाखेने केली धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक शाखेने उस्मानपुऱ्यात कारच्या काळ्या फिल्म उतरवल्या. - Divya Marathi
वाहतूक शाखेने उस्मानपुऱ्यात कारच्या काळ्या फिल्म उतरवल्या.
औरंगाबाद- वाहतुकीचेनियम मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून गुरुवारी काळ्या फिल्म लावणाऱ्या कार मालकांकडून दंड वसूल करण्यात आला. यासंदर्भात बुधवारच्या अंकात "दिव्य मराठी'ने "काळ्या फिल्मची मोहीम दिसेनाशी झाली' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई सुरू केली.

न्यायालयानेही बंदी घातलेली असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. मात्र, गुरुवारी "दिव्य मराठी'त वृत्त प्रकशित होताच पोलिस यंत्रणा कामाला लागली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक शेख अकमल, गुन्हे शाखा प्रकटीकरणचे संतोष मुदिराज, लेडी चार्ली िहना पठाण, सुप्रिया मुरकुटे, प्रियंका लहाडे, अनिता दांडगे आदी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली.

फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई
उस्मानपुरा,क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप आदी भागांत पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली. सध्या फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई सुरू असून चौकाचौकांत पोलिस दिसून येत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अनेक वाहनचालकांना दंड करण्यात आला.

गैरकृत्य करण्याची शक्यता
काचांनाकाळ्या फिल्म लावलेल्या चारचाकीसह पोलिस लिहिलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. आजपासून पोलिसांनी काळ्या फिल्म लावून फिरणाऱ्या गाड्यांना लक्ष्य केले आहे. परराज्यांतूनही दररोज अनेक कार येतात. गुन्हेगार काळ्या फिल्म लावून गैरकृत्य करू शकतात.