आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे शाखेने पकडला बारा लाखांचा गुटखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परराज्यातूनशहरात आलेला बारा लाख रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा मारून जप्त केला.

जुना मोंढा परिसरात शेख नदीम शेख नईम यांची तीन गोदामे आहेत. या गोदामात गुटख्याचा मोठा साठा असून शहरात चढ्या दराने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने गोदामावर छापा मारला. तीनही गोदामांत गोवा, आरएमडी, हिरा गुटख्याचा साठा आढळून आला. गोदामाचा मालक शेख नदीम यास पोलिसांनी अटक करून गुटखा जप्त केला. ही कारवाई उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, विलास काळे, प्रकाश गायकवाड, नवनाथ परदेशी, किशोर काळे, सुरेश बोडखे, प्रकाश काळे, संजय हंबीर, महेश कोटमवार, बाळासाहेब राठोड यांनी केली.