आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या रोखण्याकरिता ‘पोलिस आपल्या दारी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगर,सिडको महानगर, ग्रोथ सेंटर सिडको परिसरातील कामगार दिवाळीसाठी गावाकडे गेल्याची संधी साधून चोरटे कुलूप तोडून घरे साफ करीत असतात. या घटना टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी थेट नागरिकांपर्यंत पोहाेचून त्यांना सूचना मार्गदर्शन करीत आहेत.
याबाबत व्यापाऱ्यांचीही बैठक दोन दिवसांपूर्वी ठाण्यात घेतली होती. यापूर्वीच्या पोलिस निरीक्षकांनी सोसायटी मालकांना ठाण्यात बोलावून मार्गदर्शन केले होते. मात्र, या वेळी प्रथमच स्वत: पोलिस नागरिकांपर्यंत पोहाेचत असल्यामुळे सकारात्मक चर्चा सुरू आहे. दिवाळीसाठी कामगार १० ते १५ दिवसांची सुटी काढून कुटुंबीयांसह मूळ गावी जात असतात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे घरे फोडून किमती एेवज लंपास करतात. हा अनुभव दरवर्षी पोलिस प्रशासनाला येताे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत परिसरातील मोरे चौक बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये चोरीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीदरम्यान चोरीच्या घटना टाळता याव्यात, या हेतूने पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी प्रथमच थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधत, सूचना अाणि मार्गदर्शन करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

गावाला जाण्यापूर्वी हे करा : गावालाजाण्यापूर्वी जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. शेजारी राहणाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी. सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. शक्यतो प्रत्येक मोठ्या सोसायटीमधील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रहिवासी वसाहतीमध्ये संशयितरीत्या फिरणाऱ्या व्यक्तीची माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात (वाळूज एमआयडीसी ०२४०-२२४०५५९) किंवा १०० नंबरवर द्यावी, भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, गावी जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान वस्तू सोबत न्याव्यात अथवा बँक आदी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.

^पोलिस ठाण्यातील बैठकीला बहुतांश कमी लोक हजेरी लावतात. त्यामुळे कमी लोकांपर्यंत संदेश, सूचना पोहाेचतात. म्हणून थेट नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना सूचना देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. सूचनांबाबतची पत्रकेही छापण्यात आली आहेत. -नाथा जाधव, पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...