आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भामट्यांना भोपाळमधून अटक, एम. सिडको पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेत तिकीट चेकरच्या नोकरीचे अामिष दाखवून तरुणांना फसवणाऱ्या टोळीतील दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी भोपाळमधून अटक केली. सचिन अशोक पवार (१९, रा. आंबेडकरनगर, भोपाळ), वेदप्रकाश देवचरण दुबे (३१, रा. कैलासनगर, भोपाळ) अशी आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
चिकलठाणा औद्योगिक परिसरातील नारेगाव गल्ली नं. मध्ये सुनील विठ्ठल नवघरे (३८) यांनी याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फसवणूक होऊन तीन वर्षे झाल्यामुळे या आरोपींना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. आरोपी सचिन मूळचा फुलंब्रीचा, तर वेदप्रकाश दुबे यवतमाळचा आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, विक्रम वाघ, संजय मुंडले यांनी दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये जाऊन तेथील पोलिसांच्या मदतीने या दोघांना अटक केली. गंडवणाऱ्या टोळीतील गौतम शंकर शेळके (रा. किन्ही), शैलेश खान (रा. कोलकाता) हे दोघे अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...