आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवर स्टंटबाजी; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
 अमरावती-  २६ जानेवारीला एपीआय शिरसाट यांना फरफटत नेणारा स्टंटबाज अद्यापही मोकळा असताना शुक्रवारी (दि. ३) दुपारी एका स्टंटबाजाने विद्याभारती महाविद्यालयासमोर सिंधुताई मधुकरराव कुंभलकर नामकन महिलेला उडवले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून इर्शाद अंजुम मिर्झा (२० रा. चपराशीपुरा) या स्टंटबाजाविरुद्ध शुक्रवारी (दि. ३) गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 
त्याचप्रमाणे वाहतूक शाखेच्या पूर्व विभागाचे पोलिस निरीक्षक दिगंबर नागे त्यांच्या पथकाने बियाणी चौक पंचवटी चौक मार्गावर वेगवेगळ्या दोन स्टंटंबाजांना पकडले. यापैकी एक स्टंटबाज अल्पवयीन आहे तर दुसऱ्याचे नाव क्षितीज मधुकर मेहरे असे आहे. क्राईम ब्रँचने वारंवार स्टंटबाजी करणाऱ्यांची माहिती काढली असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...