आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजारांत "डस्टर'चे आमिष, टोळी गजाआड; सहा हजार लोकांना फसवणार होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयडीसी सिडको पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
एमआयडीसी सिडको पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - "अवघेचार हजार रुपये जमा करा आणि लकी ड्रॉमध्ये डस्टर गाडी घेऊन जा,' असे आमिष दाखवणाऱ्या टोळीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गजाआड केले. या टोळीतील सात जणांना अटक झाली. यात ब्रदी बकाल, निवृत्ती ऊर्फ बालाजी बकाल यांचा समावेश आहे. योगेश मानकापे नावाचा व्यक्ती अद्याप फरार आहे. टोळीने लकी ड्रॉमध्ये सामील होण्यासाठी हजार ९९९ लोकांकडून प्रत्येकी चार हजार जमा केले होते.

या टोळीने सहा आठवड्यांपूर्वी साई बहुद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे कुठलीही परवानगी घेता लकी ड्रॉचा उपक्रम सुरू केला. हजार ९९९ व्यक्तींना या उपक्रमात सहभागी म्हणून नोंदवून घेतले. प्रत्येक व्यक्तीकडून चार हजार रुपये घेतले. हे पैसे एकदम भरा किंवा ११ आठवड्यांत भरा, अशी सवलत दिली. उपक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना दुचाकी, विविध भेटवस्तू आणि शेवटच्या आठवड्यात बुलेट, डस्टर, यामाहा, ट्रॅक्टर, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ अशा अनेक गोष्टींचे आमिष दाखवले. लकी ड्रॉच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार अर्ज आला होता. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी शनिवारी सोडतीच्या वेळी चिकलठाण्यात ज्या ठिकाणी सोडत सुरू होतीत्या ठिकाणी छापा टाकत सात जणांना अटक केली. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक सरला गाडेकर करत आहेत.
जाहीर कलेले बक्षीस
प्रत्येक आठवड्यात दहा दुचाकी, सहा आठवड्यांत ५० दुचाकी वाटण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यांना दुचाकी नको होत्या, त्यांनी पैसे घेतले. याशिवाय बुलेट, डस्टर, यामाहा, करिझ्मा, पल्सर, डस्टर, ट्रॅक्टर, नॅनो, २० वॉशिंग मशीन, ३० नग चांदीचे ब्रासलेट, १५ वाशिंग मशीन, ७०० मायक्रोवेव्ह, ५०० चांदीचे पैंजण, १००० होम थिएटर, ५०० मोटार पंप एचपी, ७०० इलेक्ट्रॉनिक शेगड्या, हजार मल्टिमीडिया फोन, ३७९ सोन्याच्या नथ, १००० सीलिंग फॅन अशी हजार ९७८ बक्षिसे जाहीर केली होती. उरलेल्या सभासदांना २१ हजार रुपये रोख देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते.
याअगोदरही घडले आहे असे प्रकार
१९९० च्या काळात दक्षिणेकडील राज्यातील लोक अशा प्रकारे आमिष दाखवून ग्रामीण भागातून पैसे जमा करत आणि पैसे जमा झाल्यावर अचानक पळून जात. काही महिन्यांपूर्वी अगदी कमी पैशांत एलईडी टीव्हीचे आमिष दाखवणाऱ्या परराज्यातील टोळीच्या विरोधात शहरातील जवाहरनगर आणि इतर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला होता.

पत्रकावर यांची नावे
यासोडतीसाठी छापलेल्या पत्रकावर बालाजी पाटील बकाल, बद्री पाटील बकाल, योगेश पाटील काळे, योगेश पाटील मानकापे, कृष्णा पाटील म्हस्के, विष्णू पाटील शिंदे, धर्मा पाटील अभंग, अशोक पाटील जाधव यांची नावे आहेत. यातील बहुतांश व्यक्ती या ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या असून उच्चशिक्षित आहेत.

असे आहे गणित
याटोळीने आतापर्यंत एक कोटी ३० लाख रुपये जमा केले होते. कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचा मानस होता. या टोळीने जाहीर केलेली बक्षिसे हजार ९७८ आहेत. राहिलेल्या व्यक्तींना प्रत्येकी २१ हजारांचे बक्षीस मिळणार होते. मात्र, बक्षिसाची रक्कम ही जमा झालेल्या रकमेच्या अधिक होती. त्यामुळे सहभागी लोकांची फसवणूक होऊ शकते, ही बाजू पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली.

पोलिसांना का आला संशय?
याप्रकरणातील व्यक्तींनी चिकलठाणा आणि परिसरातील पाच हजार ९९९ व्यक्तींकडून प्रत्येकी चार हजार रुपये जमा केले. यासाठी त्यांनी एजंटना नेमले होते. प्रत्येक व्यक्तीमागे एजंटांना ३०० रुपये मिळत असत. काही सभासद दर आठवड्याला पैसे भरत होते, तर काहींनी एकदम भरले. या सोडतीसाठी या संस्थेने शासनाची कुठलीही परवानगी काढली नव्हती. अधिक माहिती घेण्यासाठी त्यांची तीन दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांनी मिळवली आहे. याअगोदर टाकळी येथे अशा प्रकारे सोडत झाली होती, तर सुंदरवाडी आणि चिकलठाणा भागात ही सोडत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...