आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारातील फरार आरोपी २१ दिवसांनंतर पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ जीप. इन्सेट: पंढरीनाथ हिवर्डे. - Divya Marathi
आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ जीप. इन्सेट: पंढरीनाथ हिवर्डे.
औरंगाबाद - चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांच्या ताब्यातून २१ दिवसांपूर्वी फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर अटक केली. या प्रकरणी तीन पोलिस निलंबित झाले होते.

बलात्कार केल्याच्या तक्रारीवरून मुकुंदनगर येथील फकिरराव पांडुरंग दाभाडे (६०), पंढरीनाथ भीमराव हिवर्डे (२६, रा. खिर्डी, ता. औरंगाबाद) यांना १५ जुलै रोजी बुलडाणा येथील शनि मंदिरात अटक करण्यात आली होती. १६ जुलै रोजी तपासकामासाठी पोलिस त्यांना रांजणगावला घेऊन गेले असता पंढरीनाथ त्यांच्या हाताला झटका देऊन पळाला होता. याबद्दल पाेलिस उपनिरीक्षक सोळुंके, जमादार ए. एस. बागुल, पी. एल. माने यांना आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पंढरीनाथ आज मुकुंदवाडी येथे आल्याचे कळताच त्याचा पाठलाग सुरू केला आणि रेल्वेस्थानकावर त्याला जेेरबंद केले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक एन. वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहायक फौजदार कल्याण शेळके, हारुण शेख, पोलिस नाईक राजेश बनकर, सुनील जाधव, शोण पवार, सोनुने यांनी बजावली.

तो शेतात लपून बसायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरीनाथ, फकिररावने पीडित मुलीला पेढ्यातून गंुगीचे औषध देऊन एमआयडीसी वाळूज, रांजणगाव, बुलडाणा, शेगाव येथे नेले. प्रत्येक गावात तिच्यावर अत्याचार केला. फकिररावने बुलडाण्याच्या शनि मंदिरात तिच्यासोबत जबरदस्तीने लग्नही केले. १६ जुलै रोजी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यावर पंढरीनाथने सरळ एमआयडीसी शेंद्रा गाठले तेथून तो एका ट्रकने हिंगोलीला गेला. तेथून एका मित्राकडून हजार रुपये उसने घेतले. तेथून तो त्याच्या मेहकर तालुक्यातील अकोले ठाकरे या गावी पत्नीला भेटण्यासाठी गेला. पत्नी बाळंतपणासाठी तिच्या आईकडे गेली होती. त्यामुळे तो तेथेच नातेवाइकांच्या घरी, तर कधी शेतात लपून बसायचा. मात्र, नातेवाईक विचारपूस करत होते म्हणून तो औरंगाबादला आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. पीडित मुलीने आरोपींची नजर चुकवून आईशी मोबाइलवर संपर्क साधला. तिच्या आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती.
बातम्या आणखी आहेत...