आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Arrested To Ex Mla Annasaheb Mane At Gangapur

अप्पासाहेब माने यांना अटक; आज गंगापूर बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे बंधू अप्पासाहेब माने यांच्यासह दहा ते बारा जणांवर रविवारी गंगापूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी माने यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संतोष माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

यासंबंधी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार, 2 रोजी जामगाव येथील प्रकाश रामराव वाकडे यांना मारहाण केल्याप्रकरणी गंगापूर येथील बाबा बुर्‍हान शेख व हसन बुर्‍हान शेख यांना अटक करण्यात आली होती. रविवार, 3 रोजी दुपारी बाराच्या सुमारास अप्पासाहेब माने, अरुण ठोंबरे, रमेश ठोंबरे, भाऊसाहेब माने, संतोष ठोंबरे, शेषराव वाकडे, दीपक सुधाकर गवारे व इतर 10 ते 12 जणांनी पोलिस स्टेशनमध्ये घुसून पोलिसांसोबतच अरेरावी केली. अटकेत असलेल्या आरोपींना लॉकअपजवळ जाऊन शिवीगाळ केली. या वेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला, परंतु अप्पासाहेब माने यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अप्पासाहेब माने यांच्यासह दहा ते बारा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

अमानुषपणे मारहाणीचा आरोप
याप्रकरणी अप्पासाहेब माने यांचे पुतणे व जिल्हा परिषद सदस्य संतोष माने यांनी पोलिसांनी कायदा हातात घेऊन अप्पासाहेब माने यांना अरेरावी करत मारहाण केल्याचा आरोप केला. पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारानंतर गंगापूर शहरातील शिवसेनेच्या कार्यालयासमोर बैठक घेण्यात आली. शिवसेनेतर्फे सोमवार, 4 रोजी गंगापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून दुपारी 12 वाजता शिवाजी चौकामध्ये पोलिसांविरुद्ध निषेध सभा घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मणसिंग राजपूत यांनी सांगितले.