आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचा तरुणीवर अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद ; बाळापूरफाटा परिसरात राहणाऱ्या एका पंचवीसवर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून पोलिस कर्मचाऱ्याने अत्याचार केला. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. कदीर हमीद पटेल असे त्या पोलिसाचे नाव असून त्याच्यावर गुरुवारी रात्री उशिरा सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ पैठण तालुक्यातील तरुणी बाळापूर फाटा येथे राहते. मार्च २०१२ पासून कदीर पटेलची पीडित तरुणीसोबत ओळख आहे. पटेल हा पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असताना पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. विविध लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. २८ ऑगस्ट २०१५ पासून पटेल हा तिला टाळत होता. तसेच लग्न करण्यास नकार दिला. पीडितेला पटेलचे लग्न झाल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाणे गाठून पटेलविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे करीत आहेत.

पोलिसांनी पिटाळले
पीडिततरुणी सुरुवातीला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. हद्द आमच्या पोलिस ठाण्यात येत नसल्याचे सांगत पोलिसांनी तिला सिटी चौक ठाण्यात पाठवले. कायद्याने कोणत्याही पोलिस ठाण्यात झीरो प्रक्रियेने गुन्हा दाखल करून घेणे अनिवार्य आहे. मात्र मुकुंदवाडी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पटेल हा हर्सूल येथील राहत्या घरातून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सध्या त्याला निलंबित करण्यात आले आहे.
कदीर पटेल
व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेल
गेल्या तीन वर्षांत पटेलने अनेक वेळा पीडितेशी संबंध ठेवले. याचे मोबाइलद्वारे व्हिडिओ शूटिंग केले होते. ही क्लिप दाखवून तो तिला ब्लॅकमेल करत होता.