आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजदाराच्या खात्यातून 54 हजार रुपये लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केंद्रीय राखीव दलातील कर्मचार्‍याच्या पत्नीकडून एटीएम कार्ड हस्तगत करून भामट्याने 54,600 रुपये लांबवल्याचा प्रकार 4 जुलै रोजी समोर आला. एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजसाठी पोलिसांनी बँकेशी संपर्क साधल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.

हैदराबाद येथील केंद्रीय राखीव दलातील उपनिरीक्षक संतोष डोंगरे यांचे एटीएम कार्ड पत्नी सुमन (25, रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) यांच्याकडे असते. एक जुलै रोजी सकाळी त्या हजार रुपये काढण्यासाठी मिसबाह कॉलनीतील एसबीआय एटीएममध्ये गेल्या. त्यांनी उलट बाजूने एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले. पैसे निघत नसल्याने पाठीमागे उभा असलेल्या भामट्याने ‘मी पैसे काढून देतो’ असे म्हणून कार्ड घेत पिन नंबर विचारून त्यांना पैसे काढून दिले. मात्र हातचलाखीने सुमन यांचे कार्ड स्वत:जवळ ठेवून बोगस कार्ड परत केले. दुसर्‍या दिवशी सुमन यांनी भावाला पैसे काढण्यासाठी पाठवले. मात्र, कार्ड चालत नसल्याने सुमन यांनी बँकेत चौकशी केली असता एटीएम कार्ड बदलण्यात आल्याचे बँक अधिकार्‍यांनी सांगितले.