आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगाव चौफुलीवर आठ दरोडेखोर जेरबंद, टोळीत दोन महिलांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबईरोडवरील पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या आठ दरोडेखोरांना शनिवारी मध्यरात्री गुन्हेशाखेच्या पथकाने शस्त्रास्त्रासह अटक केली. यात सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तिसगाव चौफलीवर पोलिसांनी सापळा रचला होता. दरम्यान चार जण फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी श्रीरामपूरच्या पोलिसांना कळवताच त्यांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी नोटांसह लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मुंबई रोडवरील तिसगाव चौफुली जवळच्या एका हाॅटेलाजवळ आठ जण थांबल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. चौफुलीवरील एका हॉटेलच्या बाजूला थांबल्याची माहिती गुन्हे शाखेला खबऱ्याच्या मार्फत मिळाली होती. ही टोळी सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सुरेश खाडे, सहायक फौजदार रावसाहेब जोंधळे, जमादार मच्छिंद्र ससाणे, गोविंद पचरंडे, अशोक नागरगोजे. देविदास इंदोरे शेख जावेद यांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या.

टोळीतील तिघे टाटा सुमोमध्ये (एमएच-१२-वायए-५0६४) बसलेले होते. दुचाकीवर (एमएच-२२-एएफ-४0५४) असलेल्या दोघांनी पोलिसांना पाहताच धूम ठोकली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अरुणकुमार अब्राहम पटेल (२० रा. बिटरगुंटा कादेवल्ली, जि. नेल्लोर आंध्र प्रदेश ), अनिल दयाराम मायकेल (२८ रा. सदर ), मधू भास्कर रेड्डी (१९) आणि चंद्रमा कोंडया सल्ला यांना पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून मिरची पूड, लोखंडी साखळी, सुरा, दुचाकी जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या या टोळीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश खाडे करत आहेत.

पोलिसांचीसमय सूचकता : पोलिसांनीधाड टाकताच चौघांनी पळ काढला. या पथकाने श्रीरामपूरचे पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांना कळवले. त्यांनी सापळा रचून त्यांना शिर्डी पोलिसांच्या मदतीने अटक केली. यामध्ये अपराम बेनय्या पटला, दुर्गा नागराज, सावित्री इजीबो रेड्डी, रोसय्या वसंतम गोडीत (सर्व रा. ज्ञानेश्वर नगर, परभणी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून टाटा सुमो जीप मोबाइल, १२ हजारांचे विदेशी युरो चलन एकूण लाख ७९ हजार रुपये जप्त केले.

अशी आहे गुन्ह्याची पद्धत
हीटोळी शहरात फिरत असताना एखादी व्यक्ती अथवा वाहनधारकाचा पाठलाग करून थांबलेल्या ठिकाणी वाहनासमोर ऑइल टाकून, घाण टाकून त्यांची दिशाभूल करत असते. त्यानंतर कारमधील माल लंपास करते. तिखट डोळ्यात टाकून चोरी करण्याचा प्रयत्न करते. यातील बहुतांश व्यक्ती हे परप्रांतीय आहेत.