आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांसह शिपाई ऑन ड्यूटी २४ तास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाच दिवशी शहरात सहा मोठे कार्यक्रम, अनेक व्हीव्हीआयपींचा दौरा, शहरातील अतिसंवेदनशील अशा दोन वॉर्डांत महापालिकेची पोटनिवडणूक अशा वेळी कोठेही खट्ट झाले असते तर संपूर्ण शहर वेठीस धरले जाण्याची भीती पोलिसांना होती. मात्र ही अग्निपरीक्षा पोलिस प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडली. सीपी टू शिपाई अशा सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांनी रविवारी २४ तास खडा पहारा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर या महत्त्वाच्या व्यक्ती रविवारी विविध कार्यक्रमांनिमित्त शहरात होत्या. या प्रत्येक व्यक्तीच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा लावावा लागला. त्यांची वाहने रस्त्यात कुठेच अडू नयेत ही माेठी जबाबदारी. त्यात शहरातील अतिसंवेदनशील बुढीलेन आणि बेगमपुरा वाॅर्डाची पोटनिवडणूक यामुळे पोलिस यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर डोळ्यांत तेल घालून उभी होती. योग्य नियोजनामुळे कुठल्याही कार्यक्रमात अनुचित प्रकार घडला नाही.

फौजफाटा असा...
पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, सहा सहायक आयुक्त,२५ पोलिस निरीक्षक, ७० पेक्षा अधिक उपनिरीक्षक, १६ पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, सुरक्षा विभाग, गोपनीय शाखा, सायबर आर्थिक गुन्हे शाखा, राखीव दल आणि प्रशिक्षणासाठी आलेले सर्व कर्मचारी दोन दिवस खडा पहारा देत होते. शनिवारी रात्रीपासूनच भरपावसात जालना रोड निवडणुकीच्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता.
बातम्या आणखी आहेत...