आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Commissioner How Can Prevent On Corruption

पोलिस आयुक्तांसमोर भ्रष्टाचाऱ्यांचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहराची प्रतिमा बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पोलिस आयुक्तांसमोर खात्यातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. विविध उपक्रम राबवून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत बदल करणारे अमितेशकुमार खात्यातील भ्रष्टाचारावर कशा प्रकारे आळा घालतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठ दिवसांत विविध कारणांसाठी पैसे मागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दोनपेक्षा अधिक तक्रारी पोलिस आयुक्तांकडे आल्या आहेत. या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले असून चौकशी सुरू आहे. मात्र, अनेक पोलिस ठाण्यांत तक्रार नोंदवून घेणे, तपासासाठी पैसे मागणे, एखाद्या कामासाठी तक्रारदाराला वारंवार चकरा मारण्यास लावणे असे प्रकार वाढले आहेत. काही निरीक्षक आपल्या हद्दीत गुन्ह्याचे प्रमाण कमी आहे असे दाखवण्यासाठी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसते.
२१ मे रोजी महेश वर्मा यांनी आपल्या आजारी आईला जिन्सी हद्दीतील एका हॉस्पिटलमधून उल्कानगरी येथे घरी रिक्षातून आणले. दरम्यानच्या प्रवासात त्यांचा मोबाइल चोरीला गेला. म्हणून ते जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले तेव्हा तेथील ठाणे अमलदाराने त्यांना आमच्या हद्दीत हा गुन्हा घडला नाही, असे म्हणत जवाहरनगर पोलिस ठाण्यात पाठवले.
जवाहरनगरच्या ठाणे अमलदारानेही तुम्ही ज्या ठिकाणाहून रिक्षा केली होती त्या ठिकाणी जा, असे म्हणून त्यांना हुसकावून लावले. अखेर वर्मांनी तक्रार नोंदवण्याचे टाळले आणि घर गाठले.
कोठडी घेण्यासाठी पाच हजार : रिक्षाचालकविजय खुडेने १३ मे रोजी शेजाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार छावणी ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांशी संगनमत करून खुडेविरोधात गुन्हा दाखल केला. निरीक्षक फसले यांनी कोठडी नको तर पाच हजार रु. द्या, असे म्हणत आमच्याकडून पाच हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही न्यायालयात उभे केल्याचे खुडेने सांगितले. अखेर २९ मे रोजी आईवडील आणि बायकोने पोलिस आयुक्तांकडे फसले फौजदार बनसोडविरुद्ध तक्रार केली.
तपासासाठी मागितले दहा हजार : एमएस्सी उत्तीर्ण अक्षय मोटे हे नोकरीसाठी प्रयत्नशील होते. सर्च फॉर नोकरी डॉट कॉममधून या तरुणाला नोकरीसाठी फोन आले. नोकरी लावतो म्हणून या ऑनलाइन भामट्याने तरुणाला १७ हजार पाचशे रुपयांचा गंडा घातला. आपण फसलो गेल्याचे या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या भामट्याविरुद्ध तक्रार दिली.
मात्र तेथील जमादार गवारे यांनी त्याला दिल्लीला जाण्यासाठी दहा हजारांची मागणी केली. या प्रकरणाचे व्हिडिअो रेकॉर्डिंग करून या तरुणाने ते पोलिस आयुक्तांना दाखवले.