आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Commissioner Inspected Of The Ghati Hospital

पोलिस आयुक्तांनी केले घाटी रुग्णालयाचे कडक पोस्टमॉर्टेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटीत येणारा रुग्ण हा त्रस्त असतो त्यामुळे प्रत्येक रुग्णांसोबत डॉक्टरांनी सौजन्याने वागा, इमानदारीने काम करा, चांगली सेवा द्या, अशा कानपिचक्या पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घाटीची पाहणी करताना डॉक्टरांना दिल्या. घाटीत कुणी दलाल किंवा राजकीय मंडळी दबाव टाकून डॉक्टरांना त्रास देत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही असाही सज्जड दम दिला.
बुधवारी, १० जून रोजी १२.३० वाजता घाटीतील पाहणी करताना त्यांनी घाटीतील रुग्ण सेवा, व्हील चेअर, स्ट्रेचर, पार्किंग समस्या, वर्दळ, कंपाउंड वॉल, नवीन पोलिस चौकी, सुरक्षा रक्षक आपत्कालीन परिस्थितीतील तयारी, इमारतीचे फायर ऑडिट अशा घाटीतील कामांचे पोस्टमॉर्टेम केले.
घाटीमध्ये वारंवार रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये होणारे वाद त्यानंतर डॉक्टरांचा बंद, डॉक्टरांच्या वाढत्या तक्रारी अशा घटना घडत असल्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी १२.३० वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयाची पाहणी केली. आयुक्त येणार असल्यामुळे आधीच सर्व तयारी घाटीत झालेली होती. सकाळी १०.३० वाजता आयुक्त येणार होते, परंतु घाटीचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरनार, अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर तसेच बांधकाम विभागचे अधिकारी यांची पोलिस आयुक्तांच्या कॅबिनमध्ये बैठक झाली. १२.२५ पर्यंत ही बैठक चालली. त्यानंतर १२.३० ला आयुक्तांनी घाटीची पाहणी केली. या वेळी घाटीत सर्व विभागांचे प्रमुख, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, उपायुक्त संदीप आटोळे इतर अधिकारी उपस्थित होते.
एमएलसीमेलद्वारे पाठवणार
घाटीतील पोलिस चौकीतील एमएलसी असतात त्या संबंधित पोलिस ठाण्यात बुधवारपासून मेलद्वारे पाठविल्या जातील. तसेच व्हिसेरा, व्हिसेरा रिपोर्ट घाटीत जमा ठेवता तो दररोज लॅबमध्ये पाठवला जाईल.
रक्षकांच्या मॅनेजरचा अधीक्षकांशी वाद
सुरक्षा रक्षकांजवळ वॉकीटॉकी नाही का, असा प्रश्न पोलिस आयुक्तांनी विचारला असता घाटीचे अधीक्षक डॉ.सुहास जेवळीकर यांनी नाही असे सांगितले, परंतु सुरक्षा रक्षक पुरवणारे महाराष्ट्र एक्स सर्व्हिस मॅनचे रिजनल मॅनेजर कर्नल एस. जी. पुराणिक यांनी सांगितले की वॉकीटॉकी आहे, त्याच्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. याविषयी तक्रारी करूनही काही झाले नाही. यावरून डॉ. जेवळीकर चिडले. आयुक्तांनी दोघांना शांत करून चांगले काम करा, असा सल्ला दिला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आयुक्तांनी काय सल्ला दिला...