आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त संतापले, रजिस्टर फाडले; निरीक्षकाची बदली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेदांतनगर पोलिस चौकीतील गुन्हे रजिस्टर चुकीच्या पद्धतीने लिहिल्यामुळे पोलिस आयुक्तांनी चौकीचे निरीक्षक हेमंत कदम यांची तडकाफडकी सिटी चौक पोलिस ठाण्यातील नियंत्रण कक्षात बदली केली. तसेच गुन्हे रजिस्टर फाडून ते नव्याने लिहिण्याचे आदेश फौजदाराला दिले.

बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वेदांतनगर पोलिस चौकीला भेट दिली. त्यांनी गुन्हे रजिस्टर तपासले असता ते योग्य रीतीने लिहिले नसल्याचे आढळले. पोलिस निरीक्षक कदम यांना स्पष्टीकरण विचारले असता त्यांना ते देता आल्यामुळे अमितेशकुमार संतापले. रोज गुन्हे रजिस्टर कोण लिहितो, असे आयुक्तांनी विचारल्यावर कदम यांनी मीच लिहितो, असे उत्तर दिल्याने ते आणखी चिडले. एका प्रकरणाचा तपास कदम यांच्याकडे होता. या प्रकरणाची चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली होती. कदम यांची तातडीने सिटी चौक ठाण्यात बदली करून त्यांच्या जागी शरद इंगळे यांची बदली केली.
बातम्या आणखी आहेत...