आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Commissioner,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्ष नागरिक रथाला उत्तम प्रतिसाद, गणेशोत्सवात प्रबोधनासाठी पोलिस आयुक्तांचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गणेशोत्सवाचे औचित्य साधून पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी नागरिकांमधील 'जाणिवा' चेतवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यदक्ष नागरिक, सुरक्षित परिसरह्ण निर्माण करण्यासाठी त्यांनी शहरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. बुधवारपासून (३ सप्टेंबर) प्रबोधनरथाद्वारे सुरू केलेल्या या मोहिमेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
खून, मंगळसूत्र हिसकावणे, चोऱ्या, अपहरण तसेच अपघातांची संख्या लक्षात घेता दक्ष नागरिकांमुळे एखादा गुन्हा घडण्यापूर्वीच थांबवता येतो का? अथवा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नागरिकांकडून पोलिसांना मदत मिळू शकते का? या संदर्भात जाणीवजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी रेड एफएमच्या मदतीने पोलिसांनी प्रबोधन रथाची निर्मिती केली आहे. आकर्षक फ्लेक्स, त्यावर महत्त्वपूर्ण माहिती, घोषवाक्यांसह हा रथ आता गणेशोत्सवादरम्यान नागरिकांमध्ये जागृती करणार आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांसह विविध चौकांमध्ये नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी अत्यंत कमी खर्चात या रथाची निर्मिती केली आहे. बुधवारी पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली. या वेळी उपायुक्त वसंत परदेशी, अरविंद चावरिया, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, खुशालचंद बाहेती, मंगल खिंवसरा, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, मधुकर सावंत, गौतम पातारे, बंडू ओक या वेळी उपस्थित होते. मोटार परिवहन विभागाचे फौजदार अमितकुमार लिंगाडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.