आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Crime Branch Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावठी कट्टा हस्तगत; तरुणाला अटक, काडतूसही जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि इंडिका कार असा एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
रविवारी दुपारी नगरकडून औरंगाबादकडे येत असलेल्या इंडिका कारमधील तरुण देशी कट्टा विक्रीसाठी शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. नि. अविनाश आघाव यांना मिळाली. यावरून गुन्हे शाखेतील फौजदार सुभाष खंडागळे व सहकाऱ्यांनी वाळूज येथे हॉटेल दावतसमोर सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास संभाजी शेषराव नागोडे (३०, रा. डिगी, ता. नेवासा) हा या सापळ्यात अडकला. पोलिसांना त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस सापडले. तो शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता, यापूर्वी त्याने शस्त्रे विकली काय, याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.