आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर म्हशी सांभाळण्याची ड्यूटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - अवैधरीत्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी औरंगाबाद-पैठण रोडवरील टोलनाक्याजवळ ६ वाहने तसेच त्यातील ६६ म्हशींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक झाली आहे. दरम्यान, सध्या सर्व म्हशी पोलिस ठाण्याच्या आवारात बांधण्यात आल्या आहेत. त्यांच्या चारापाण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे.

बिडकीन पोलिसांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी गस्तीवर असताना ४ ट्रक व २ टेम्पोंमधून म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सर्व वाहने बिडकीन पोलिस कॉलनीच्या आवारात आणून म्हशी तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, वेळीच डॉक्टर उपलब्ध न झाल्याने ढोरकीन येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. के. इंगोले यांना बोलावण्यात आले. त्यांनी सायंकाळपर्यंत ३० म्हशींची तपासणी केली. त्यामध्ये ८ ते १० म्हशी संगोपनास योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारीदेखील म्हशींची तपासणी करण्यात आली. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक भातनाते यांनी म्हशींच्या चारापाण्याची सोय न करता त्यांना निर्दयीपणे दोरीने बांधून ठेवले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने न्यायालयाच्या आदेशापर्यंत पोलिसांनाच म्हशींना चारापाणी करावे लागणार आहे.