आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Help Kunjbihari Agrawal In Fraud Case Aurangabad

ओरिएंटलच्या अधिका-यास पोलिसांकडून मिळाले अभय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद शेतक-यांची विमा प्रकरणात फसवणूक केल्याबद्दल आयुकेअरचा संचालक तसेच कुंजू अग्रवालला परभणी पोलिसांनी अटक केली; मात्र या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिका-यांवर कारवाईस टाळाटाळ होत आहे. या प्रकरणातील कागदोपत्री पुरावे समोर येऊन चौकशीही झालेली नाही.
आयुकेअरच्या व्यवसायात अडथळे आणू नका, असे पत्र अहमदनगर येथील ओरिएंटलचे विभागीय अधिकारी राजेंद्र चौकेकर यांनी सहा महिन्यांपूर्वी कनिष्ठांना दिले. हे पत्र त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून दिले होते, याची विचारणा झाली नाही. अहमदनगर येथे 55 लाख रुपये भरण्यास गेलेल्या आयुकेअरच्या संचालकाला चौकेकर यांनी जळगावच्या ओरिएंटल कार्यालयात रक्कम भरण्याचा सल्ला दिला होता. आयुकेअरच्या सिडको येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यातून 55 लाखांचा धनादेश देण्यात आला. या सर्व बाबी समोर येऊनही ओरिएंटलच्या अधिका-यांना संरक्षण दिले जात आहे.
चौकशी सुरू आहे - आयुके अरचा आणि आमचा काही संबंध नाही. जळगाव येथील ओरिएंटलने आयुकेअरकडून रक्कम कुणाच्या सांगण्यावरून स्वीकारली, याची चौकशी सुरू आहे. - व्ही. कुमार, विभागीय व्यवस्थापक, नागपूर विभाग, ओरिएंटल इन्शुरन्स