आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधारीचे 70 हजार घेण्यासाठी अपहरण, विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या घरासमोरील प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उधार दिलेले सत्तर हजार परत घेण्याकरिता आपल्याच व्यवसायातील भागीदाराला सुपारी देऊन अपहरण करत डांबून ठेवल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. अपहृताने युक्तीने स्वत:ची सुटका करून घेत पोलिस आयुक्तालय गाठले. त्याचा शोध घेत तेथे आलेल्या पप्पू अशोक इंगळे आणि फेरोज महंमद तांबोळी (दोघेही रा. खोकडपुरा) या दोन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी पकडले. या प्रकरणातील तिघे अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या निवासस्थानापासून अवघ्या 60 फूट अंतरावर हे अपहरण नाट्य घडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडकल गेट परिसरातील काचीवाडा भागात राहणारा संदीप प्रकाश हिवराळे (28) याने त्याचा वाळू व्यवसायातील भागीदार राजू भुतेकर याच्याकडून वर्षभरापूर्वी 70 हजार रुपये उधारीवर घेतले होते. दोन-तीन महिन्यांत रक्कम परत देतो, असे संदीपने म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात संदीपने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. भुतेकरने तगादा लावूनही संदीप त्याला दाद देत नव्हता. मोबाइलवर
वारंवार कॉल करूनही कॉल उचलत नव्हता.
अशी केली सुटका
संदीपला डांबून ठेवल्यानंतर हे सर्वच दारू प्यायले. ते दारूच्या नशेत असताना दुपारी चारच्या सुमारास संदीपने लघुशंकेचा बहाणा केला. तेथून तो धावत मुख्य रस्त्यावर आला. खिशात स्विच ऑफ असलेला मोबाइल सुरू करून वडिलांशी (ते सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी आहेत) संपर्क साधला. ते तातडीने पोलिस आयुक्तालयात मदत मिळवण्यासाठी पोहोचले. काही वेळाने संदीप एका वाहनाने आयुक्तालयात आला. त्याच्या पाठोपाठ पप्पू आणि फेरोजही मिल कॉर्नरला पोहोचले. तेव्हा पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले.