आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Inspector Hemant Kadam Beat To Traders In Aurangabad

कदम यांची व्यापाऱ्याला पुन्हा मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपक पवार)
औरंगाबाद- अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी टीव्ही सेंटर येथील दीपक पवार या व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. पवार यांनी तत्काळ पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता याची चौकशी पोलिस उपायुक्तांकडे दिली असून अहवालानंतर कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मंगळवारी देखील कदम यांनी वोक्हार्ट चौकात रिक्षाचालकांना मारहाण केली होती. बुधवारी त्यांच्या नेतृत्वाखाली टीव्ही सेंटर भागातील अतिक्रमण काढणे सुरू आहे. या दरम्यान, पवारांच्या दुकानासमोरील शेड काढण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यांनी पवारांना शिवीगाळ करत श्रीमुखात भडकावली. हा प्रकार पाहून त्यांची पत्नी आणि मुलगा रडू लागले. शेजारच्या काही महिलांनी मध्यस्थी केल्यानंतर कदम यांनी मारहाण थांबवली. याबाबत कदम यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.