आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वाजता हाेणारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉक ड्रीलदरम्यान अतिरेक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इन्सेट : मॉक ड्रीलची व्हॉट्सअॅपवर झळकलेली माहिती. छाया : मनोज पराती - Divya Marathi
मॉक ड्रीलदरम्यान अतिरेक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इन्सेट : मॉक ड्रीलची व्हॉट्सअॅपवर झळकलेली माहिती. छाया : मनोज पराती
औरंगाबाद- पोलिस यंत्रणा किती सतर्क आहे, हे जाणून घेण्यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येते. मात्र शनिवारी संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या मॉक ड्रीलची माहिती दुपारी तीन वाजताच व्हॉट्सअॅपवरील अनेक ग्रुपवर फ्लॅश झाल्यामुळे त्यातील गांभीर्यच गेले आणि यंत्रणा तपासण्याची केवळ औपचारिकता राहिली.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सामान्य नागरिकांनी आणि पोलिसांनी कशा प्रकारे सामोरे जावे याचा अनुभव यावा म्हणून यासाठी मॉक ड्रीलचे अायाेजन केले जाते. हडको कॉर्नर येथील डी मार्ट मॉलमध्ये चार अतिरेकी घुसले आहेत. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना ओलीस धरले असून ते अतिरेक्यांची सुटका करण्याची मागणी करीत आहेत, असे कथानक तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. या प्रसंगाला उर्वरित.पान
अशा कुठला प्रसंगाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कंट्रोल रूम काय करते.

अति शीघ्र कृती दल आणि गुन्हे शाखेचे पथक या प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे जातात.
घटनास्थळाच्या आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांचे अधिकारी किती मिनिटांत घटनास्थळी पोहोचतात, हे पाहिले जाते.