आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत पोलिस ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- औरंगाबादहून पैठणकडे येत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी व विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात  पोलिस कर्मचारी ठार, तर  त्यांची पत्नी व समोरील दुचाकीवरील व्यक्तीही गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी एमआयडीसी परिसरातील जैन स्पिनर थांब्याजवळ झाला. सूर्यकांत दगडू डहाळे (५२, रा. भिवधानोरा, ता. गंगापूर) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.   

सूर्यकांत  डहाळे हे पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्याच वेळी    मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर निघालेल्या  ज्ञानेश्वर पंढरीनाथ जाधव (रा. गणेशनगर, ता. पैठण) याची व डहाळे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.  यात  डहाळे गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डहाळे यांची पत्नी आणि ज्ञानेश्वर जाधव हे दोघे जखमी झाले.  
बातम्या आणखी आहेत...