आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीडते झाल्टा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर इंडिका कार घालणाऱ्या वाळू माफियाला बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. लक्ष्मण बाबूराव गाडे (रा. कोळी बोडखा, ता. अंबड, जि. जालना) असे या वाळू माफियाचे नाव आहे. हवालदार धीरज जाधव यांनी संघर्ष करून गाडेला पकडले. या वेळी हवालदार रोहिदास तांदळे जखमी झाले आहेत.
बुधवारी सकाळी आठ वाजता बीड रोडवर हवालदार रोहिदास तांदळे, धीरज जाधव हे आपले कर्तव्य बजावत होते. झाल्टा फाट्यावर एक विनाक्रमांकाची आयशर गाडी वेगात जात होती. गाडीवर संशय आल्याने तांदळे यांनी थांबण्याचे सांगितले. गाडी थांबल्यावर तांदळे यांनी आपला परिचय करून देत गाडीत काय आहे, असे विचारले. त्या वेळी चालक राजू उबाळे (रा. बीड) याने वाळू असल्याचे सांगितले. वाळूच्या रॉयल्टीबाबत विचारले असता रॉयल्टी आणि संबंधित कागदपत्रे नव्हती म्हणून त्याला गाडी चिकलठाणा पोलिस ठाण्याकडे घेण्यास सांगितली.
दरम्यान, एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार घटनास्थळी आली. त्यातून तीन-चार व्यक्ती उतरले आणि तांदळे यांच्या अंगावर धावून गेले. थांब तुला मारून टाकतो, असे म्हणत त्यातील एका व्यक्तीने कार तांदळे यांच्या अंगावर घातली. त्यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. त्या वेळी कार आणि आयशर गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, धीरज जाधव आणि तांदळे यांनी कारचा पाठलाग केला. बीड बायपास रोडवरील शिवदत्त पेट्रोल पंपाजवळ गाडी थांबली तांदळे यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या व्यक्तीने गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. श्रीधर, पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली.
धीरज जाधव