आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारित्र्यावर संशयावरून पोलिस शिपायाने पत्नीला पेटविले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारित्र्यावर संशय घेत पैठणच्या खुल्या कारागृहातील पोलिस शिपायाने पत्नीला पेटवल्याची घटना शनिवारी (16 फेब्रुवारी) उघडकीस आली. या शिपायाला सातारा पोलिसांनी अटक केली असून, त्याची पत्नी सध्या बेंबडे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. सातारा परिसरातील रेणुका माता मंदिराच्या परिसरात राहणार्‍या विष्णू आसाराम काकडे (35) याने त्याची पत्नी वैशाली हिच्यावर संशय घेत तिला 13 फेब्रवारी रोजी अंगावर रॉकेल ओतून रात्री 9 च्या सुमारास पेटवले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास याप्रकरणी विष्णू काकडे याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे करीत आहे.