आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: औरंगाबादकरांना हेल्मेट सक्ती करणारे पोलिस स्वतः मात्र असे फिरतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्मेट न घालता गाडी चालवणारा ट्राफिक पोलिस. - Divya Marathi
हेल्मेट न घालता गाडी चालवणारा ट्राफिक पोलिस.
सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मेट आवश्यकच आहे. औरंगाबाद शहरात त्याची सक्ती करण्याचा निर्णयही झाला. त्यानंतर विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या १२ हजार १०४ जणांना फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी दंड ठोठावला. त्यातून १२ लाख २३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला; पण ज्यांनी ही कारवाई केली त्यातील काही पोलिस हेल्मेट वापरत नसल्याचेही समोर आले आहे. ‘फोटो काढा व्हाॅट्सअॅप करा’, या डीबी स्टारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाचक वाहतूक नियम मोडणाऱ्यांची छायाचित्रे डीबी स्टारकडे पाठवतात. यात पोलिसांचे फोटोही पाठवण्यात आले. सर्वसामान्यांवर कारवाई होते, मग पोलिसांवर का नाही, असा सवाल या वाचकांनी केला आहे. आम्ही ही छायाचित्रे वाहतूक विभागाकडे पाठवली.
पुढे वाचा... हेल्मेट न वापरणा-या पोलिसांवर होणार कारवाई