आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकार्‍याने निलंबन रद्द व्हावे यासाठी चक्क बनवले बनावट ‘जीआर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आपल्यावर ओढवलेले निलंबन संपुष्टात यावे, म्हणून एका अज्ञात पोलिस अधिकार्‍याने चक्क अप्पर मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीचा बनाव रचून बोगस शासन निर्णय तयार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने निलंबित झालेले कर्मचारी आणि अधिकार्‍यांना दोन वर्षानंतर कामावर रुजू करून घेण्यासंदर्भात बनावट शासननिर्णय करून घेण्यात आला आहे. या बनावट जी.आर.वर 31 मार्च 2013 चा उल्लेख आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक ईशु सिंधू यांच्याकडे 15 एप्रिल 2013 रोजी यासंदर्भात टपालाने पाठवण्यात आला होता. पण त्यांच्याकडे नेमका कुणी पाठवला याचा उल्लेख केलेला नव्हता, त्यामुळे काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. दरम्यान बनावट जीआर वर्धा येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक दारासिंग राजपूत यांनीही फॅक्स केल्याचे निदर्शनास आले आहे. सिंधू यांनी पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे यांसदर्भात बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे पुढील तपास करत आहेत.