आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Patil Recruitmant Ignore Department Of Revenue

पोलिस पाटलांची पदे भरण्यास महसूल विभाग उदासीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत महसूल विभागाच्या वक्रदृष्टीमुळे गावपातळीवर रिक्त असलेली पोलिस पाटलांची 2 हजार 578 पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावपातळीवर घडणाºया विविध घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यासाठी गावपातळीवर रिक्त असलेली पोलिस पाटलांची पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी पोलिस प्रशासन व नागरिकांतून जोर धरत आहे.
राज्यात गावपातळीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच चोरी, चोरीचा माल, कैदी, संशयित मृत्यू, गुन्हे यासंदर्भात पोलिसांना वेळोवेळी माहिती देणे तसेच प्रामुख्याने तलाठी, ग्रामसेवक व पोलिस अधिकारी यांना विविध तपासात नियमित सहकार्य करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया पोलिस पाटलांची रिक्त पदे अद्यापही भरलेली नाहीत. त्यामुळे सध्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 हजार 875 पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांत अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त, मृत्यू तसेच बिंदुनामावली प्रमाणित केलेली नसणे आदी कारणावरून महसूल विभागाने रिक्त झालेल्या जागेवर नव्याने पोलिस पाटलांची नियुक्ती केली नाही. उलट महसूल विभाग विविध कारणे सांगून ही पोलिस पाटलांची पदे भरण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मराठवाड्यात सध्या मंजूर, कार्यरत, रिक्त पोलिस पाटलांची माहिती व त्याची कारणे याविषयी सविस्तर माहिती डिसेंबर 2011 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने मागवली होती. मात्र, त्यानंतर मराठवाड्यात रिक्त असलेल्या पोलिस पाटलांच्या पदासंदर्भात कुठलेच पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही पदे अद्यापही रिक्तच आहेत. औरंगाबाद विभागात आठ जिल्हे असून त्यात 76 तालुके आहेत. या तालुक्यांत 8 हजार 415 गावे आहेत. मात्र, या गावांत स्थानिक व सरकारी कर्मचाºयांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी पोलिस पाटलांची 8 हजार 63 पदे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी सध्या 5 हजार 485 पोलिस पाटील कार्यरत आहेत, तर महसूल प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मराठवाड्यात आजघडीला 2 हजार 578 पदे अजूनही रिक्त आहेत.

पोलिस पाटलांची सद्य:स्थिती
जिल्हा गावांची संख्या मंजूर भरलेली रिक्त
औरंगाबाद 1376 1279 780 499
जालना 97 949 595 354
परभणी 850 826 532 294
हिंगोली 708 653 375 278
नांदेड 1549 1562 1408 154
बीड 1192 1282 762 427
लातूर 943 872 519 353
उस्मानाबाद 737 730 511 219
एकूण 8,415 8,063 5,485 2,578