आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेव बोहल्यावर चढण्यासाठी 10 मिनिटे असतांना पोलिसांनी रोखला बालविवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुंडलिकनगर येथील चैतन्य मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास पोलिसांनी रोखला. नवरदेव बोहल्यावर चढण्यासाठी केवळ दहा मिनिटांचा अवधी असतानाच पुंडलिकनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. कागदपत्रे तपासल्यानंतर १७ वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा दहा वर्षे मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले. 

पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी या मुलीची चौकशी केली असता मला अधिकारी व्हायचे आहे, मात्र घरचे माझे लग्न लावून देत आहेत, असा जबाब तिने पोलिसांना दिला. तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. वडील एका खासगी कंपनीत कामगार आहेत. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. त्यानंतर लग्नासाठी आलेले २०० पाहुणे जेवण करून परतले. भावी नवरदेव महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करत असल्याचे कळते. पोलिस उपनिरीक्षक आर. एस. पवार, शेख सलीम, सुनील राऊत, बन, गायकवाड, मीनाक्षी जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...