आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाद होता होता २०० उमेदवार ठरले नाबाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्यावर्ष भरापासून घाम गाळून शेकडो तरुणांनी पोलिस भरतीची तयारी केली. जिवाची बाजी लावून मैदानावर शारीरिक चाचणीत मेरिट मिळवले. मात्र, उत्तरपत्रिकेवर चेस्ट नंबर लिहिताना तो चुकीच्या पद्धतीने लिहिल्याने आपण स्पर्धेबाहेर फेकले जाणार, या विचाराने त्यांच्या छातीचा ठोका चुकून डोळ्यांत पाणी तरळले. पण पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांना उत्तरपत्रिका बदलून देताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. चेस्ट नंबर हाच संपूर्ण भरती प्रक्रियेसह परीक्षा क्रमांकही असतो.
बुधवारी पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर पोलिस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. दहा हजार उमेदवारांतून स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सिद्ध केलेल्या ९५४ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ९१२ उमेदवारांनी बुधवारी देवगिरी मैदानावर लेखी परीक्षा दिली. पोलिसांनी नियोजनूपर्वक या परीक्षेची आखणी केली. दुपारी तीन वाजेपासून उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. चार वाजून पन्नास मिनिटांनी परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा ९० मिनिटे चालली.

या वेळी विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी परीक्षक म्हणून उपस्थित होते. स्वत: पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, संदीप आटोळे यांच्यासह ७० अधिकारी आणि ३०० कर्मचारी हजर होते. सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, सुखदेव चौघुले, पोलिसांच्या प्रशासकीय विभागातील रवींद्र, कुलकर्णी, देशपांडे, उंबरे, पोलिस निरीक्षक भारत काकडे, विल्सन सिरीन, अशोक मुदीराज यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, हेमंत कदम, नागनाथ कोडे, निर्मला परदेशी, मुकुंद पालवे, अजमल शेख, कैलास प्रजापती, चंद्रकांत सावळे, डुकरे पाटील, गडबडे, पेन्शनकर, सलीम शेख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

प्रत्येकाचे कान तपासले : राज्यराखीव पोलिस दलाच्या भरतीत काही उमेदवारांनी हेडफोन लावला होता. पोलिसांच्या खबरदारीमुळे ते पकडले गेले. या पार्श्वभूमीवर उमेदवारांची कडक तपासणी करण्यात आली. कुणी कानात मायक्रोफोन लावला का, हे तपासण्यात आले.
लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांना उत्तरपत्रिका बदलून देण्यात आल्या. छाया : अरुण तळेकर
उत्तरपत्रिकेवर चेस्ट नंबर लिहिण्यासाठी सहा रिकामे रकाने देण्यात आले होते. अनेकांचे चेस्ट नंबर तीन ते चार आकडी होते. पहिल्या रकान्यात शून्य लिहून उर्वरित रकान्यांत चेस्ट नंबर लिहायचा होता. मात्र अनेक उमेदवारांना ते समजलेच नाही. काहींनी पहिल्याच रकान्यात चेस्ट नंबर लिहून त्याच्यापुढे शून्य शून्य टाकले. विशिष्ट पद्धतीने चेस्ट नंबर लिहिल्यास उमेदवार स्पर्धेतून बाद होतात. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी चेस्ट नंबर लिहिण्यात चुकलेल्या उमेदवारांना पुन्हा उत्तरपत्रिका दिल्या. ९५४ उमेदवारांंतून अंतिम ५६ उमेदवार निवडण्यात येणार आहेत. परीक्षा संपल्यानंतर अर्ध्या तासाने या उमेदवारांना अॅन्सर की देण्यात आली असून रात्री नऊ वाजेपर्यंत अलंकार संभागृहात उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...