आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतीसाठी आलेल्या भावी पोलिसांना वेगवेगळे नियम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवून भावी पोलिसांचे भरती अर्ज रद्द केले जात आहेत, तर दुसरीकडे हेच अर्ज पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वीकारले जात आहेत. यामुळे तरुणांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. काही जणांनी याबद्दल बुधवारी पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे धाव घेत गा-हाणे मांडले. तेव्हा त्यांनी तुमच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, ही दखल नेमकी कोणत्या स्वरूपात घेतली जाणार आहे. मुलाखतीची संधी मिळणार की नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. त्यामुळे तरुणांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. पोलिस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयात शिपाई पदासाठी 6 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दररोज 750 उमेदवारांना संधी दिली जात आहे. त्यापैकी काही उमेदवारांना त्यांनी न केलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे पात्र ठरवले जात आहे. याबाबत आज दहा उमेदवारांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

रिजेक्टेड मेसेज आला
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरत असताना इंटरनेट कॅफेवर शैक्षणिक कागदपत्रे नेली असता कॅफेवरील संगणकात गुणपत्रिकेचा अनुक्रमांक भरताना अर्ज रिजेक्टेड असा मॅसेज आला. त्यामुळे उमेदवारांनी मुंबईच्या पोलिस महासंचालक कार्यालयातील हेल्पलाइनवर संपर्क साधला. तेव्हा गुणपत्रिकेतील क्रमांकानुसार अर्ज रिजेक्ट केले जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

..तरीही अपात्र ठरले
त्यानुसार आज पोलिस भरतीकरिता हे तरुण उमेदवार मूळ कागदपत्रांसह हजर झाले. त्या वेळी कागदपत्रे पडताळणीमध्ये उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी खोलात तपासणी केली असता तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज स्वीकृत होत नसल्याचे स्पष्ट झाले. अशाच स्वरूपाचा अर्ज पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वीकारला गेला,

तेव्हा त्यांनी अखेरचा उपाय म्हणून राजेंद्र सिंह यांची भेट घेतली. तांत्रिक त्रुटींमुळे भरतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली. आयुक्तांनी त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले. त्यांना भेटणा-यांमध्ये विकास उबाळे, गोपीचंद वाणी, पूनमचंद वाणी, जितेंद्र रनसिंग, उमेश रनसिंग, अभिजित म्हस्के, रवी पोळ, मंगेश निकम, प्रशांत गाडेकर, मनोज शेळके यांचा समावेश होता.