आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीत पोलिसांचे गिर्यारोहण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करताना तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उंच इमारतीवर चढ - उतार सहजपणे करता यावी, या दृष्टीने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या गिर्यारोहणाच्या प्रात्यक्षिकाचा थरार पर्यटकांनी रविवारी प्रत्यक्ष अनुभवला. प्रसिद्ध गिर्यारोहक म्हणून शेख रफीक ताहेर हे परिचित आहे. ते २००६ मध्ये खुलताबाद पोलिस ठाण्यात रुजू झाले. शेख रफीक ताहेर यांनी वेरूळच्या कैलास लेणीत सुरेश त्रिभुवन, शीतल साळवे, श्रीकांत आराख, समद पठाण, सुदर्शन दळवी, नारायण जोरी या गिर्यारोहकांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थी सर्वजण वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले खेळाडू आहेत. त्यांनी वेरूळ लेणीमध्ये साधारण २०० फूट उंचीवर दोन तास गिर्यारोहणाच्या प्रात्यक्षिकांची कसरत केली.