आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पोलिसांची करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात कोणत्याही शहरावर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ३९० पोलिस कर्मचारी आणि ७२ अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात पोलिस आयुक्तांच्या आदेशाने कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालयात पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ६० पोलिस कर्मचारी, १२ महिला कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक, २५ कर्मचारी, घातपातविरोधी पथक असा बंदोबस्त राहणार आहे.

शहरात इतर ३९० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, हॉटेल-लॉज, पर्यटनस्थळांचीही तपासणी होत आहे.