आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत भूषणच्या मित्राला पोलिस भेटू देत नाहीत, मृताच्या भावाचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रांतीचौक ठाण्याचे पोलिस भूषणच्या मित्राला मला भेटू देत नाहीत, असा आरोप समर्थनगरात संशयितरीत्या मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाने केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत भूषणचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृताचा भाऊ प्रमोद हिवराळे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली.
अपघाताच्या वेळी भूषणचा मित्र रोहित गोत्राळ हा त्याच्यासोबत होता. नेमके काय घडले हे त्याला माहीत आहे; पण पोलिसांनी त्याला पोलिस कोठडीत बंद करून ठेवले आहे. त्यामुळे सत्य समोर येत नाही, अशीही प्रमोदने "दिव्य मराठी'कडे आपली व्यथा मांडली. या प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मृताच्याशरीरावर जखमा : मृतभूषण हिवराळेचे काका अनिल हिवराळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. ज्या वेळी भूषणचा अपघात झाला त्या वेळी त्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होती तिने या अपघाताची संपूर्ण माहिती सांगितल्याचे ते सांगतात. अपघातानंतर पोलिसांनी गाडीमध्ये भूषणला मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर अर्धा तास पोलिस त्याचे पार्थिव गाडीत फिरले. मग घाटीत गेले. भूषणचा भाऊ प्रमोद काका अनिल यांनी पाहिले तेव्हा त्याचा मृतदेह काळा-निळा झाला होता.

सर्वकाही संदिग्ध... : मृताच्याकुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार भूषणचा मित्र रोहितला भेटण्यासाठी गेला असता पोलिसांनी नकार दिला. त्याला कोणत्या कारणास्तव अटक केली, अशी विचारणा केली असता त्याने आमच्यासोबत अरेरावी केल्याचे कारण सांगण्यात येते. मात्र, यासंबंधी तपास अधिकारी अशोक देहाडे यांना विचारले असता रोहित अटकेत नसून त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सांगितले. अपघातानंतर पोलिसांनी भूषण आणि रोहितचा जप्त केलेला मोबाइलदेखील आम्हाला देत नसल्याचे प्रमोदने सांगितले.

सीआयडीचौकशीची मागणी... : याप्रकरणीभूषणचे काका अनिल हिवराळे यांनी सीआयडी चौकशी करावी, असे निवेदन पोलिस आयुक्त पोलिस निरीक्षकांना देणार असल्याचे "दिव्य मराठी'ला सांगितले. भूषणचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असून पोलिसांचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही हिवराळे यांनी केला.

तरुणाला मारहाण झाली नसून त्याचा मृत्यू अपघातात झाला आहे. तो रस्त्यावर पडला होता. हे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला लगेचच उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. - खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...