आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Should Awakening To People Issue At Aurangabad

मंगळसूत्र चोऱ्यांवर पोलिस करणार प्रबोधन वॉर्डावॉर्डांत फिरून करणार आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांनो, मंगळसूत्र चोरापासून सावधान.. संकटसमयी पळून जाऊ नका.. शेजाऱ्याला मदत करा.. तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते.. कुणी संशयित व्यक्ती दिसली तर तत्काळ पोलिसांना कळवा.. जागते रहो...असे आवाहन आता पोलिस करणार आहेत. मंगळसूत्र चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रबोधन रथ तयार करण्यात आला आहे.
मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट लक्षात घेत पोलिसांनी "दक्ष नागरिक, सुरक्षित परिसर' ही योजना तयार केली आहे. त्यासाठी शहरातील सर्व वॉर्डांत फिरून प्रबोधन केले जाईल. यात महिलांनी दागिने कसे वापरावेत, गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. मंळसूत्र वर काढू नका, ते सार्वजनिक ठिकाणी झाकून ठेवा, त्याला पिन लावा, जास्त दागिने घालून गर्दीत जाऊ नका, कोणी संशयित व्यक्ती महिला-मुलींचा पाठलाग करत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांसाठी तयार केलेली घोषवाक्ये
१ संकटसमयी प्रत्येकास मदत करा, बघ्याची भूमिका घेऊ नका
२ सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा, पोलिसांना मदत करा व गंभीर गुन्हा रोखा
३ सार्वजनिक ठिकाणी संशयित वस्तू, वाहन आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्ष ०२४०-२२४०५००, २३५१३४८ किंवा १०० वर फोन करा
४ मौल्यवान दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका
पोलिसांना सहकार्य करा
शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी प्रबोधन रथाची अभिनव योजना हाती घेतली आहे. पोलिसांची भीती न बाळगता नागरिकांनी मित्राप्रमाणे सहकार्य करावे. प्रथमच शहरात हा प्रयोग करत आहोत. वसंत परदेशी,
पोलिस उपायुक्त.