आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा ठिय्या; अतिक्रमण करून रस्ता अडवल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नारेगाव येथील पटेलनगरमध्ये असणाया गट नं. 13 मध्ये एका व्यक्तीने अतिक्रमण करून रस्ता अडवल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याविरोधात नागरिकांनी महापालिका आणि पोलिस अधिकार्‍यांना निवेदन देऊनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रविवारी दुपारी 12 वाजता जवळपास शंभर लोकांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून अतिक्रमण करणार्‍या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली.

पटेलनगरमध्ये असणार्‍या गट नं. 13 वरील प्लॉट नं. 65 आणि 24 मध्ये असणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर रफिक शहा कुर्बान शहा याने अतिक्रमण केले आहे. रस्ता अडवून तो अनेक दिवसांपासून 5 लाख रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या ठिकाणी मोठी वस्ती झाली असून रस्ता अडवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहा हा गुंडांच्या माध्यमातून रहिवाशांना धमकावतो. तसेच अनेकवेळा त्याने रहिवाशांना मारहाण केली आहे.
त्याची पत्नी शिवीगाळ करून अंगावर धावून जाते. दरम्यान, शनिवारी (21 जून) रफिक शहा व त्याच्या साथीदाराने अतिक्रमित रस्त्यावर अवैध बांधकाम सुरू केले. यासंदर्भात काही रहिवाशांनी त्यास जाब विचारला असता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या शंभरवर रहिवाशांनी रविवारी दुपारी सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत शहा याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात रहीम पटेल, शेख आरिफ शेख उस्मान, शेख कय्युम, शेख अब्दुल रज्जाक, नईम पटेल, शेख सलीम, फैजान खान, सलीम पटेल, शेख रईस, सिराज शहा, अहेमद शहा, अब्दुल मुजाहेद, अब्दुल मुकीद, शेख इब्राहिम, शेख गुलाम रसूल, गप्फार खान, जलील देशमुख सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षकांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
चौकशी करू
नारेगाव येथील नागरिकांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे. सदरील प्रकरणात गट नं. 13 मधील प्लॉटची कागदपत्रे तपासून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
- अनिल वाघ, पोलिस उपनिरीक्षक, एमआयडीसी पोलिस स्टेशन, सिडको

तक्रार करूनही कारवाई नाही
४सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार आम्ही 18 मे 2013 पासून महानगरपालिका, महसूल आयुक्त, मालमत्ता कर अधिकारी, पोलिस निरीक्षकांकडे करीत आहोत. मात्र यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. शहा हा अनेकदा नागरिकांना धमकावतो, मारहाण करतो. यामुळे रहिवासी भयभीत झाले आहेत.
- नईम पटेल, रहिवासी, नारेगाव