आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांजणगावात पोलिसांनी रोखला बालविवाह; सहा जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांजणगाव शेणपंुजीत विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पूजेसाठी लक्ष्मीकांत देशमुख गुरुजी मंडपात दाखल झाले होते. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
रांजणगाव शेणपंुजीत विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पूजेसाठी लक्ष्मीकांत देशमुख गुरुजी मंडपात दाखल झाले होते. छाया : दिव्य मराठी
वाळूज- रांजणगावशेणपुंजी येथे होत असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी हस्तक्षेप करून रोखला. या प्रकरणी वर आणि वधूपक्षाकडील एकूण सहा जणांना पोलिसांनाी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलाचे वय १९, तर मुलीचे वय १५ वर्षे आहे.

येथील दत्तनगरातील गल्ली नं. मध्ये सुनील लक्ष्मण कडवे (४०, रा. बैलबाजार, क्रांतीनगर, मंुबई) यांच्या १५ वर्षीय मुलीचा विवाह १९ वर्षीय युवकासोबत लावला जाणार होता. या विवाह सोहळ्यासाठी मुलीचे मामा अमोल दिगंबर अरसुले (२८) मावसमामा सचिन गोरखनाथ धस (२७, रा. दत्तनगर, गल्ली नं. ४, रांजणगाव शेणपंुजी) यांच्या घरासमोर मंडप उभारला होता. वऱ्हाडी, वाजंत्री आदी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याचबरोबर विवाह लावण्यासाठी लक्ष्मीकांत भगवानराव देशमुख हे गुरुजीही उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजेचा लग्नाचा मुहूर्त जसजसा जवळ येत होता तसतशी नवरीकडील नातलगांची धांदल उडत होती. कुठे काही कमी पडू नये म्हणून सर्वांची धावपळ सुरू होती. लग्नविधी सोहळ्यास तासाभराचा अवधी बाकी होता. सर्वांचे लक्ष मुहूर्ताकडे होते. मंडपात पाहुण्यांची ये-जा सुरू होती. तेवढ्यात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संजय भैरव, सहायक पोलिस उपनिरीक्षक पंडित वाघ यांच्यासह पथक मंडपात दाखल झाले. त्यामुळे सर्वच वऱ्हाडी थबकले.

दोघेहीअल्पवयीन
पोलिसांनाबालविवाह होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिस पथकाने थेट मुलीच्या पित्याची भेट घेऊन तिच्या वयाबाबत जाणून घेतले. त्यानंतर मुलीचीही चौकशी केली तेव्हा मुलीने तिची जन्मतारीख १८ डिसंेबर २००० अशी सांगितली. मुलानेही त्याची जन्मतारीख २१ ऑगस्ट १९९५ , वय १९ वर्षे असल्याचे सांिगतले. दोघेही अल्पवयीन असल्याने विवाह करणे हे कायद्यानुसार गुन्हा असल्याचे सांगून पोलिसांनी हा विवाह रोखला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील सुनील कडवे, आई सुरेखा, मामा अमाेल अरसुळे, मावसमामा सचिन धस, तर मुलाकडील मुलाचे दाजी रोहिदास दादा ढवळे (रा. जातेगाव टेंभी, ता. वैजापूर), सतीश माधव वाघमारे (रा. गोधेगाव, ता. कोपरगाव) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिस उपनिरीक्षक संजय बहिरव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.

काय म्हणतो कायदा?
भारतातिहंदू विवाह कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बालविवाह घडवून आणणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षे कारावास तसेच लाखांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.