आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस उपनिरीक्षक रमेश साळींचा दाेन दुचाकींच्या अपघातात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिन्नर येथील पोलिस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा शनिवारी जेलराेड परिसरात दाेन दुचाकींच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. नारायणबापूनगर ते टाकळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण हाेता की, माळी यांच्या डाेक्याची मागील बाजू पूर्णत: निकामी झाली हाेती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले साळी हे अॅक्टिव्हा (एमएच १५ इझेड ०५०४) या दुचाकीवरून टाकळीकडून जेलरोडकडे चालले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या पॅशन प्रो (एमएच १५ सीए ११०३) या दुचाकीशी त्यांची समाेरासमाेर धडक झाली. यावेळी दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने साळी हे रस्त्यावर अादळले अाणि घसरत गेले. त्यामुळे त्याच्या डोक्यास पाठीमागील बाजूस जबरदस्त मार बसला. 

हा अपघात इतका भयानक होता की त्यांची कवटी फुटून मेंदूचा काही भाग पंधरा ते वीस फूट दूर पडला होता. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनी मृतदेह झाडांच्या फांद्यांनी झाकला. या घटनेची माहिती कळताच साळी यांच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह उचलण्यास उशीर केल्याचा आरोप त्यांनी केला. सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर हे घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी नातेवाइकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात अाणली अाणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वर्दळीच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असल्यामुळे या भागात वाहनांचा वेग आटोक्यात राहण्यासाठी गतिराेधक बसविण्याची पोलिसांची गस्त सुरू करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली अाहे.  

सहकाऱ्यांत हळहळ 
रमेशसाळी हे काही काळ नाशिक- राेड पाेलिस ठाण्यात कार्यरत होते. स्वभाव मनमिळावू असल्याने त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच सहकाऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...