आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - जालना शहरातील नागरिकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी आैरंगाबाद हायकोर्टात दाखल फौजदारी याचिकेत पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. एआयएस चिमा यांनी दिले आहेत. जालना येथील संजय राऊत, करण राऊत, गौतम मघाडे व देवा देवरे यांनी हायकोर्टात अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत फौजदारी याचिका दाखल केली. औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल आदर्श पॅलेसमध्ये पोलिसांनी बिसलरी बॉटल मागितली.
पाण्याच्या बॉटलचे पैसे मागितल्यामुळे पोलिसांनी चिडून वेटरसह हॉटेलमालकास बेदम मारहाण केली. यातील अनेकांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अनेकांना किडनी व हृदयाचे विकार झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत तर दीड महिन्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले. जालना शहरातील राऊत कुटुंबीयांच्या मालकीचे उपरोक्त हॉटेल असून त्यात घुसून पोलिसांनी गुंडांप्रमाणे मारहाण केल्यामुळे अशा पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची पोलिसांनी दखल घेतली नाही की साधी चौकशीही केली नाही. बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केल्याच्या प्रकरणात पोलिस सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. ही कृती कायदाविरोधी असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली. हॉटेल कर्मचारी व नागरिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. गुंड गोंधळ घालतात, त्याप्रमाणे पोलिसांनी गोंधळ घातल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

पुढील सुनावणी ३ ऑगस्टला
याचिकेत पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, जालना पोलिस अधीक्षक आदींना प्रतिवादी करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अनिल काळे, सहायक फौजदार पाटील आदींसह अनेक पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत. हायकोर्टाने पोलिस अधीक्षक यांना नोटीस बजावून सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...