आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस घेणार सीसीटीव्हीचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठाकरेनगरातील घरफोडीचा छडा लावण्यासाठी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत. घटनेदरम्यान या परिसरातून जाणार्‍यांचे फुटेज तपासून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न मुकुंदवाडी आणि गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत, तर दुसरीकडे डॉक्टरांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुमन प्रधान यांच्यावर उपचार करून येशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

घरफोडी होऊन चोवीस तास उलटूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, मुकुंदवाडी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रधान यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवले. तसेच परिसरातील बंगल्यावर आणि रस्त्यावर बसवलेल्या फुटेजमध्ये कोणी कैद झाले का, यासाठी फुटेज शोधले जात आहेत. बुधवारी घेतलेल्या जबाबात पोलिसांनी त्यांच्या सोयीप्रमाणे जबाब लिहून घेतल्याने तपासात काही हाती लागेल की नाही, अशी शंका प्रधान यांनी व्यक्त केली.

प्रधान कुटुंबीय दीड वर्षांपूर्वी औरंगाबादेत वास्तव्यास आले आहे. त्यांचा मुलगा व मुलीच्या सोयरिकीबाबत बोलणी सुरू होती. यादरम्यान पूर्वतयारी म्हणून सुमनबार्इंनी सून व मुलीसाठी काही दिवसांपूर्वी दोन आणि स्वत:साठी असे मिळून तीन मंगळसूत्रे, कर्णफूल, बांगड्या आणि पैंजण असे सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने बनवले होते. दागिने बनवल्यानंतर ते अंगावर कसे दिसतात हे पाहण्यासाठी मुलगी वृंदाने आईच्या अंगावर ते घालून मोबाइलमध्ये फोटोही काढला होता. त्याच्या दोनच दिवसांनंतर सुमनबार्इंना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(फोटो - संग्रहीत फोटो)