आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्तीसाठी दिमतीला बॅटरीची दुचाकी; अजिंठा लेणीत पोलिस व्हॅनला गस्तीसाठी परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर- अजोड शिल्पकलेचा नमुना व अद््भुत रंगसंगतीमुळे युनोस्कोने गौरवलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पुरातत्त्व विभागाने २००२ मध्ये टी पॉइंट ते लेणीदरम्यान खासगी वाहनांना बंदी घातली होती. तेव्हा तेथे प्रदूषणविरहित बससेवा सुरू करण्यात आली होती.
 
दरम्यान, सोयगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस वाहने गस्तीसाठी व लेणीत जाण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु परवानगी मिळाली नाही. त्यानंतर नुकतेच वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या फर्दापूर पोलिस ठाण्याला पोलिस वाहने लेणीत गस्तीसाठी घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात आली . त्यात आता फर्दापूर ठाण्याला दोन बॅटरीवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित दुचाकी गस्तीसाठी मिळाल्या असून गुरुवारी या दोन गाड्या ठाण्यास प्राप्त झाल्या आहेत. या बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींमुळे आता पोलिसांना गस्तीसाठी सोय झाली आहे.  

१५ ऑगस्ट २००२ मध्ये थेट लेणीत वाहने जात असल्याने वाहनांच्या प्रदूषणाचा परिणाम लेणी व येथील कलाकुसरीवर होत असल्याचे निदर्शनास अाल्यावर २००२ पासून खासगी वाहनांना लेणीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली व प्रदूषणविरहित बससेवा सुरू करण्यात आली.  त्यामुळे कुठल्याही खासगी व शासकीय वाहनास या अंतरात प्रवेश करण्यासाठी कायद्याने बंदी करण्यात आली. परंतु या परिसरात वन विभाग, भारतीय पुरातत्त्व विभागासह कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेचे वाहनही लेणीत प्रवेश करू शकत नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे संबंधित विभागाने शासनाकडे पोलिस वाहने लेणीत जाऊ देण्यास परवानगी मागितली होती. पंधरा वर्षांनंतर परवानगी मिळाली. कागदपत्रांची पूर्तता सोयगाव ठाण्याने केली अन् परवानगी अखेर वर्षभरापूर्वी नव्याने झालेल्या फर्दापूर ठाण्याला मिळाली. लेणी परिसरात गस्त घालण्यासाठी अजिंठा वन विभागासह भारतीय पुरातत्त्व विभाग पोलिस ठाणे फर्दापूर यांच्या वाहनांना परवानगी दिली होती. यासंदर्भात सपोनि निमिष मेहेत्रे यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात दुचाकीवर गस्त सुरू होईल. 
बातम्या आणखी आहेत...