आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावी जाणाऱ्या पोलिस तरुणीची काढली छेड, दोघे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- आजारी आईला भेटण्यासाठी दुचाकीवर गावी निघालेल्या पोलिस तरुणीची नगर-औरंगाबाद महामार्गावरील लिंकरोड चौकालगत मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी छेड काढली. प्रतिकार केल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली. नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. इरफान मोसा शेख (२८), सय्यद माजीद अली आबेद अली (२३, दोघेही रा. चिश्तिया कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत २६ वर्षीय पोलिस तरुणी गंगापूर येथे गावी निघाली होती. दुसऱ्या दुचाकीवर (एमएच सीएम ३८९६) इरफान माजीद हे गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे इरफानच्या मामाला भेटण्यासाठी जात होते. दोघांनी तिचा रेल्वे उड्डाणपुलापासून पाठलाग केला.
तेथून तिची छेड काढणे सुरू केले. "मी पोलिस आहे, मला त्रास देऊ नका,' असे तिने दोघांना समजावले. मात्र तरीही ते छेड काढतच होते. लिंकरोड चौकात एकटी असल्याचे पाहून दुचाकी थांबवून तिला मारहाण केली. तेथून वाळूज येथील अमोल मनाळ, ललित राऊत, गणेश राऊत दुचाकीने जात होते. सर्वांनी मिळून दोघांना चोपले. वाळूज एमआयडीसी ठाण्यातील निरीक्षक जी. एच. दराडे, उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक जयकुमार चक्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

"पोलिस तर ओळखीचे'
मारहाणसुरू असताना माजीद तेथून निसटला. पोलिसांनी इरफानला ठाण्यात आणले. पोलिस जमादार योगेश कुलकर्णी यांनी इरफानला माजीदशी मोबाइलवर संपर्क साधण्यास सांगितले. "पोलिसवाले आपलेच असून ओळख निघाली आहे. त्यांना पैसे देण्यासाठी ५०० रुपये कमी असून तू येथे ये..', असे त्याने फोनवर सांगितले. त्यानंतर माजीद तत्काळ हजर झाला आणि त्यालाही अटक झाली. पोलिस जमादार सुनील म्हस्के, अनिल तुपे, वाहतूक शाखेचे अनिल पवार यांनी पुढाकार घेतला.
बातम्या आणखी आहेत...