आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडाने हल्ला होऊनही जिगरबाज पोलिसाने पकडले दोन चोरटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; सातारापरिसरातील भीमाशंकर कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोर-पोलिसांत सिनेस्टाइल चकमक घडली. चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिंद्र शेळके या पोलिस कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी इमारतीवरूनच दगडफेक केली. त्यामुळे ते डोके फुटून रक्तबंबाळ झाले. तरीही शेळके यांनी साहस दाखवून दोघांच्या मुसक्या आवळल्या. शेळके यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद विजय बत्तीसे अनिल प्रकाश पोळ (रा. मिलिंदनगर) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भीमाशंकर कॉलनी येथील जैन शाळेजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे वाजता बांधकाम इलेक्ट्रिकचे साहित्य चोरण्याच्या उद्देशाने दोन चोरटे इमारतीत घुसल्याचे सुरक्षा रक्षक लक्ष्मण सौदागर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती कळवली. तेव्हा नुकतेच सुरू करण्यात आलेले पीसीआर मोबाइल पथक तत्काळ साताऱ्याकडे रवाना झाले. सातारा पोलिस चार्लीही पीसीआर मोबाइलच्या मदतीला धाऊन आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्याचे लक्षात येताच इमारतीत लपलेल्या दोन्ही चोरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करून इमारतीच्या पाइपवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. चोरटे ज्या पाइपने खाली उतरत होते, तिकडे शेळके यांनी धाव घेतली असता चोरांनी शेळके यांच्यावर दगड भिरकावले. एक दगड त्यांच्या डोक्यात लागल्याने रक्तस्राव सुरू झाला. तरीही शेळके पुढे सरसावले आणि दोन्ही चोरांना पकडून सहकाऱ्यांना बोलावून घेतले. पकडलेले दोघेही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत.

पोलिसांनासहकार्य करा : शेळकेयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपआयुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे यांनी त्यांची भेट घेतली. शेळके यांनी दाखवलेली हिंमत कौतुकास्पद असून नागरिकांनी अशा घटनांत पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्हेगार पकडले जातील, असे मत अमितेशकुमार यांनी व्यक्त केले. शेळके यांच्या उपचाराचा सर्व खर्च आरोग्य पोलिस कल्याण निधीतून करण्याची सूचना अमितेशकुमार यांनी अविनाश आघाव यांना केली. या वेळी पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांचीही उपस्थिती होती.