आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर पाच वर्षांनी धोरण आखणारे बदलावेत- सुप्रिया सुळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सामान्यांच्या भल्यासाठी प्रत्येक पाच वर्षांनी धोरणे बदलायला हवीत. तसेच धोरणे आखणारेही बदलले पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एमजीएममध्ये ‘सामाजिक न्याय’ या विषयावरील चर्चासत्राचा त्यांच्या उपस्थितीत समारोप झाला त्या वेळी त्या बोलत होत्या.

"जात, आरक्षण आणि सामाजिक न्याय' या विषयावरील चर्चासत्रात प्रा. हरी नरके यांनी जातिव्यवस्था बळकट करण्याचे काम येथील निवडणुका करतात. उमेदवार जातीय गणितांशिवाय निवडूनच येत नाहीत, अशी टीका केली. हाच धागा धरून खासदार सुळे म्हणाल्या, आमच्या (आघाडी) सरकारने केलेल्या धोरणांसहित सर्व सरकारने केलेली धोरणे सतत बदलली पाहिजेत.

भाषणांचे पुस्तक तयार करणार
चर्चासत्रातीलविविध विषयांवर झालेल्या वक्त्यांच्या भाषणांचे संकलन करून ग्रंथ काढण्यात येणार आहे. या ग्रंथाचे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी मुंबई येथे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे खासदार सुळे यांनी जाहीर केले.