आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policy Of Marathwada Shikshan Prasarak Mandal Put Stay By Court

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयांना अंतरिम स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या रचनेत बदल करणारा कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय 19 सप्टेंबरपर्यंत घेऊ नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल व न्या. ए.आय.एस. चिमा यांनी दिले आहेत. मंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना 18 जून 2013 रोजी जारी करण्यात आली. निवडणुकीसाठी निरीक्षक नेमण्यात यावा, अशा आशयाचा अर्ज काही सभासदांनी धर्मादाय विभागाकडे केला होता. यानुसार सहायक धर्मादाय आयुक्तांनी 9 जुलै 2013 रोजी निवडणुकीसाठी निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यास मंडळाचे तत्कालीन सचिव मधुकरराव मुळे यांनी खंडपीठात आव्हान दिले. विश्वनाथ तुपे पाटील व इतरांनीही निवडणूक बेकायदेशीर ठरविण्याची मागणी स्वतंत्र याचिकेद्वारे केली होती. मंडळाची निवडणूक 10 जुलै 2013 रोजी पार पडली. त्यात संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश सोळंके, तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. दोन्ही याचिकांची खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी आहे. या प्रकरणात मधुकरराव मुळेंतर्फे अ‍ॅड. ए. सी. धर्माधिकारी, विश्वनाथ तुपे यांच्याकडून अ‍ॅड. प्रमोद पाटणी, सरकारतर्फे किशोर गाढवे, सभासदांतर्फे अ‍ॅड. दिलीप चौधरी व अ‍ॅड. नंदकुमार खंदारे, संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लहानेंच्या वतीने अ‍ॅड. भरत वर्मा यांनी काम पाहिले.