आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polio News In Marathi, Polio Vaccination Epigram Program, Divya Marathi

जिल्ह्यात सर्वत्र पोलिओ लसीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी पल्स पोलिओ अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. कन्नड तालुक्यात 287 बूथ होते. या वेळी 0 ते 5 वयोगटातील 3 हजार 298 बालकांना डोस पाजण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून पोलिओ मुक्त भारत होण्यास मदत होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए.के.विडेकरांनी सांगितले.
या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूनम राजपूत यांच्या हस्ते बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह राजपूत, वैद्यकीय अधिकारी डॉ. रंदे (नागद), दिलीप तारु, सचिन बेदमुथा, हिरालाल राजपूत, संजय पाटील, संपदा चव्हाण, आशा समन्वयक इंगळे, राठोड पवार, टी.डब्ल्यू उबाळेंसह आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
अंधारीत लसीकरणाला प्रतिसाद
अंधारी । प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ अभियान उत्साहात राबवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पांडे यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानासाठी डॉ.अमोल काकड, समाधान जुमडे, शैला सहाने, किरण मोरे, रूपा पेशरवार, वर्षा तायडे, संगीता राजपूत, बिलकीस सय्यदसह आदींची उपस्थिती होती.
पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
पाचोड । येथील अंगणवाडीमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष राजू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी 0 ते 6 वयोगटातील मुला-मुलींना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले. याप्रसंगी सरपंच कृष्णा भुमरे, जिजा भुमरे, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद तारे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक सुनील जाधव व आशा कार्यकर्त्यांनी विशेष पर्शिम घेतले.
डॉ. दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण
पाचोड । येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य उपसंचालक डॉॅ. दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासह अंगणवाड्या, बसस्थानक आदी ठिकाणी डोस पाजण्याची सोय करण्यात आली होती. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी भोजने, डॉ. आनंद तारू, डॉ. शिवाजी पवार, डॉ. प्रदीप माले, डॉ. वैशाली खेडकर, गणेश मांगळूरकर, राहुल गडकरी, विष्णू चेडे, परिचारिका विमल जाधव, छाया गाढे, दीपा ढगे, अण्णासाहेब नेमाणे आदींची उपस्थिती होती.
200 बालकांना पोलिओ लसीकरण
लासूर स्टेशन 2 गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे रविवार, 23 रोजी बालकांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले. डोणगाव येथे 0 ते 5 वयोगटांतील सुमारे 200 बालकांना लस पाजण्यात आली. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद अलाट यांच्या र्मगदर्शनाखाली डोणगाव येथे लसीकरण करण्यात आले. लसीकरणास गावातील महिला व ग्रामस्थांनी आपल्या बालकास पोलिओ लस डोस पाजून उत्स्फूर्तपणे आपले कर्तव्य बजावले. या पल्स पोलिओ लसीकरणास डोणगावमध्ये नियुक्त केलेल्या आशा स्वयंसेविका वंदना शिंदे, नांगरे तसेच अंगणवाडी कार्यकर्ती सुनंदा बकाल मदतनीस तोलाबाई नवले आदींनी पुढाकार घेतला.